चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणी 11 पोलिस निलंबित, पत्रकारालाही अटक
पुणे : खरा पंचनामा
महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्यावर शनिवारी शाईफेक करण्यात आली. या प्रकरणी आता 11 पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये 8 पोलीस कर्मचारी व 3 पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
पुणे येथील पिंपरी चिंचवड येथे चोख बंदोबस्त असतानाही चंद्रकांत पाटील यांच्यावर मनोज गरबडे आणि त्यांच्या दोन साथीदारांनी शाईफेक केली. त्यानंतर मनोज गरबडेसह आणखी दोन जणांना पोलिसांनी अटकही केली. या प्रकरणी कोणत्याही पोलिसांवर कारवाई करु नका, त्यांची यामध्ये काहीही चूक नाही अशी विनंती चंद्रकांत पाटील यांनी केली होती. तरीही पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे.
शाईफेक प्रकरणात आता एका पत्रकारालाही अटक करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या दोन व्यक्तींसोबत हा पत्रकारही सहभागी झाला होता. ठरवून शाई फेकीचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.