सांगलीत 2 मोटारसायकल चोरट्यांना अटक
सांगली : खरा पंचनामा
सांगली शहरातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ही कारवाई केली. त्यांच्याकडून चोरीच्या 3 मोटारसायकल जप्त करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सांगितले.
समीर फैय्याज सय्यद (वय.२६वर्षे रा. समता कॉलनी शामरावनगर सांगली), आवेश इसाक जमखानवाले (वय १९ वर्षे सिद्धीविनायक चौक, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
हफीफल
सांगली जिल्हयातील मोटार सायकल चोरीच्या गुन्हयांबाबत पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी आढावा बैठकीमध्ये मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार निरीक्षक शिंदे यांनी एक पथक तयार केले होते.
पथकाने सांगली बातमीदारामार्फत माहिती घेतली असता, विक्रम खोत व संतोष गळवे यांना माहीती मिळाली की, दोन संशयित विना क्रमांकाचे मोटर सायकल वरून धामणी चौक शंभर फुटी रोड परिसरात फिरत आहेत. त्यानुसार पथकाने सापळा रचून समीर आणि आवेश या दोघांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी विश्रामबाग परिसरातून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली.
शामरावनगर मधील खुल्या जागेमध्ये लावलेल्या वरील तीन मोटारसायकली त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्या.
पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शिंदे, विक्रम खोत, संतोष गळवे, अनिल कोळेकर, उदय माळी, संदीप पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.