राज्यातील 225 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; 32 जण वेटिंगवर
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील सुमारे 225 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या गुरुवारी करण्यात आल्या. तर 32 जणांना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे. गुरुवारी आस्थापना विभागाचे अपर पोलिस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांच्या स्वाक्षरीने या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत.
राज्यातील अनेक पोलिस अधिकारी प्रशासकीय तसेच विनंती बदल्यांच्या प्रतीक्षेत होते. आज बदलीच्या बहुप्रतिक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. राज्यातील 225 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर 32 अधिकाऱ्यांना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वेटिंगवरील अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांची पुणे शहरात बदली करण्यात आली आहे. तर तुरची पोलिस प्रशिक्षण केंद्र येथील रेश्मा मुलाणी यांची सीआयडीकडे बदली झाली आहे. सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुजय घाटगे यांची तुरचीला बदली झाली आहे. रत्नागिरी येथील निरीक्षक अरविंद बोडके, एसआयडीचे सुधीर भालेराव, मीनल कोळेकर, मुंबई शहर येथील निरीक्षक सतीश कदम, महेंद्र दोरकर यांची सांगलीत बदली करण्यात आली आहे.
विविध कारणांनी विनंती बदल्यांसाठी अर्ज दिलेले अधिकारी मात्र अद्याप बदलीच्या प्रतीक्षेत असल्याची चर्चा आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.