पाच जणांच्या खुन्याला 28 वर्षांनी अटक
मुंबई : खरा पंचनामा
महिला आणि तिच्या चार मुलांच्या हत्येप्रकरणी 28 वर्षांनंतर संशयिताला अटक करण्यात आली. मीरा भाईदर वसई विरार पोलिसांनी ही कारवाई केली.
नोव्हेंबर 1994 मध्ये झालेल्या खुनात कथितपणे सहभागी असलेल्या तीनपैकी एक असलेल्या राजकुमार चौहानला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली. अन्य दोघे अनिल आणि सुनील सरोज फरार आहेत.
गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा प्रकरणांची यादी मागवली होती. या यादीत एकूण 11 प्रकरणं आढळून आली. त्यातील सर्वात क्रूर घटना म्हणजे, जागराणी देवी प्रजापती (वय 27) आणि तिच्या चार मुलांचा खून ही आढळून आले. 'जागराणी देवी यांच्या पतीचा 2006 मध्ये अपघाती मृत्यू झाला होता. या प्रकरणातील सर्व संशयित उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याचं पोलिसांना आढळून आलं.
तपासाअंती राजकुमार चौहान उर्फ कालिया हा कतारचा रहिवासी असल्याचं पोलिसांना आढळून आलं. त्याच्या पासपोर्टची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना त्याच्याविरुद्ध लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं. गुरुवारी चौहान मुंबईत आल्यावर त्याला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेण्यात आलं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.