राज्यातील 30 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; नांगरे पाटील लाचलुचपतला, फुलारी नाशिकचे आयजी, रितेशकुमार पुण्याचे सीपी
मुंबई : खरा पंचनामा
मंगळवारी रात्री उशिरा राज्यातील 30 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विश्वास नांगरे पाटील यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर महासंचालकपदी, पुण्यातील सुनील फुलारी यांची नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक म्हणून तर रितेशकुमार यांची पुण्याचे पोलिस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
सह सचिव व्यंकटेश भट यांच्या सहीने मंगळवारी हे आदेश देण्यात आले आहेत. विश्वास नांगरे पाटील सध्या बृहन्मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सह आयुक्त म्हणून काम करत होते. त्यांची आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पुण्यातील मोटार वाहन विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची नाशिकचे विशेष पोलिस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. राज्याचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांची नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
गुन्हे अन्वेषणचे अपर पोलीस महासंचालक रितेशकुमार यांची पुण्याच्या आयुक्तपदी तर पुण्याचे आयुक्त अमिताभ गुप्ता यांची कायदा आणि सुव्यवस्था विभाग मुंबईचे अपर पोलिस महासंचालक म्हणून बदली करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.