शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाने गंडा; दोन कंपनीच्या 5 जणांवर गुन्हा
सांगली : खरा पंचनामा
अधिक लाभ देण्याच्या आमिषाने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक केल्याप्रकरणी दोन कंपनीच्या 5 जनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगलीच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
राईट वे सपोर्ट सिस्टीमचे बापूसाहेब वाघमारे, रमेश पाटील-कातुरे, सुरेश कारंडे यांच्यासह ब्रेटवेल ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स कंपनीचे अमित भंडारे, रोहिणी सूर्यवंशी अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत.
या दोन्ही कंपन्यांनी सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील शंभर फुटी रस्ता चौकातील एका इमारतीत कार्यालय थाटले होते. सर्व संशयितांनी सांगली जिल्ह्यासह राज्यातील अनेक गुंतवणूक दारांना अधिक परताव्याचे आमिष दाखवले होते. त्यांच्याकडून गुंतवणुकीसाठी पैसे घेऊन त्यांना त्याचा सांगितल्याप्रमाणे परतावा दिला नाही. याबाबत अनेकांनी फिर्यादी दिल्या आहेत.
या दोन्ही कंपन्यांच्या एकूण फसवणुकीचा आकडा मोठा असल्याने पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे दिला. त्यानंतर शाखेच्या अधिकाऱ्यांनी तपास करून दोन कंपनीच्या 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फसवणूक झालेल्या लोकांनी सांगली आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.