Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या, सांगलीतील 6 जणांचा समावेश

राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या, सांगलीतील 6 जणांचा समावेश 




मुंबई : खरा पंचनामा 

राज्यातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक दर्जाच्या 676 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्यातील 6 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 

आस्थापना विभागाचे अपर पोलिस महासंचालक संजीवकुमार सिंघल यांनी या बदल्यांचे आदेश दिले आहेत. यामध्ये 257 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 32 निरीक्षक नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. सहाय्यक निरीक्षक पदावरील 335 जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. उपनिरीक्षक दर्जाच्या 84 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचाही यामध्ये समावेश आहे. 

सांगली जिल्ह्यातील निरीक्षक विपीन हसबनीस यांची पुणे शहराकडे तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुजय घाटगे यांची तुरची पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे बदली झाली आहे. राज्य गुप्तवार्ताचे निरीक्षक सुधीर भालेराव, रत्नागिरीचे अरविंद बोडके यांची सांगलीला बदली करण्यात आली आहे. तुरची येथील रेश्मा मुलाणी यांची सीआयडीकडे बदली झाली आहे. 

सांगली जिल्ह्यातील सहाय्यक निरीक्षक पदावरील अनिल माने, विकास जाधव, संगीता माने यांची मुंबई शहर येथे बदली करण्यात आली आहे. कोल्हापूर येथील उपनिरीक्षक सीमा बडे यांची तुरची पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे बदली करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.