चोपडे हॉस्पिटलला ग्राहक न्यायालयाचा दणका
सांगली : तानाजी शिवाजी गुजले, व. ४० वर्षे , रा. हतनूर, ता. तासगाव, जि. सांगली यांच्या पायाच्या ऑपरेशन मध्ये झालेल्या निष्काळजीपणाबद्दल सांगली येथील ग्राहक न्यायालयाच्या ३ पैकी २ सदस्यांनी गुजले यांचा अर्ज अंशतः मंजूर करून निकाल देताना , सांगली येथील १) चोपडे हॉस्पिटलच्या डॉ.आशुतोष चोपडे व २) डॉ. मोसेस इंगटी या दोघांनी मिळून अर्जदार गुजले यांच्या पुढील ऑपरेशनचा जो खर्च होईल तो दयावा, र.रु.५०,०००/- गुजलेंच्या औषधपाण्यासाठी म्हणून , र.रु.१,९८,००० /- गुजलेंच्या आधीच्या ऑपरेशनचा खर्च म्हणून तसेच र.रु.२,००,०००/- गुजले याना झालेला शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई देण्याचा आदेश केला आहे. अर्जदार तानाजी गुजले यांचे वतीने ॲड.अश्विनी शहा, ॲड.चिराग सोनेचा, ॲड.प्राजक्ता सोनेचा, ॲड.दिपक साळुंखे या वकिलांनी काम पहिले.
हतनूर येथील रहिवासी तानाजी गुजले हे त्यांच्या डाव्या पायात दुखत होते म्हणून लोकल डॉक्टरांच्या सल्याने सांगली येथील डॉ. आशुतोष चोपडे यांना दाखविण्यासाठी गेले असता डॉक्टरानी त्यांना ऑपरेशन करावे लागेल म्हणून सांगितले. त्यानुसार तानाजी गुजले यांचे डॉ. आशुतोष चोपडे यांच्या हॉस्पिटल मध्ये ऑपरेशन करण्यात आले. ऑपरेशन नंतरही त्यांच्या पायाला सुजून येऊन मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. त्यांना चालता, उभे राहता येत नव्हते. डॉक्टरांना याबाबत सांगुनही त्यानी वेळोवेळी फक्त औषधे बदलून दिली व लोकल डॉक्टरांकडून ड्रेसिंग करून घेण्यास सांगितले. लोकल डॉक्टर ड्रेसिंग करीत असताना त्यांना जखमेमध्ये ऑपरेशनचे वेळी कापसाचा बोळा राहिल्याचे दिसून आले ल त्यामुळे जखम बरी होत नव्हती त्यातून पू येत होता . गुजले यांनी डॉ. आशुतोष चोपडे यांना याबाबत विचारणा केल्यावर त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्रास असह्य झाल्यावर गुजले यानी परत एमआरआय करून घेतला असता त्यांना आणखी एका ठिकाणी कापसाचा बोळा राहिल्याचे दिसून आले. सदरचा बोळा काढण्यासाठी डॉक्टरानी त्यांना तीन लाखाच्या आसपास खर्च सांगितला.
अखेर नाईलाजाने गुजले यांनी ग्राहक न्यायालयात डॉ. आशुतोष चोपडे , डॉ. मोसेस इंटगी व डॉ. अमोल सोनटक्के यांचेविरुद्ध तक्रार दाखल केली होती . सर्व साक्षीपुरावे तपासून ग्राहक न्यायालयातील तीन पैकी दोन सदस्यांनी गुजले यांच्या बाजूने तर अध्यक्षांनी गुजले यांच्या विरुद्ध निकाल दिला . अशा रीतीने ग्राहक न्यायालयात दोन विरुद्ध एक असा गुजले यांच्या बाजूने निकाल दिला गेला .
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.