कासेगावजवळ देशी बनावटीचे पिस्तुल जप्त, एकाला अटक
सांगली : खरा पंचनामा
जिल्ह्यातील कासेगावजवळ देशी बनावटीचे पिस्तुल घेऊन फिरणाऱ्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक पिस्तुल, मारुती व्हॅन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. प्रकाश वसंत निकम (रा. भाटवाडी ता वाळवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलीस अधिक्षक डॉ बसवराज तेली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांना ग्रामपंचायत निवडणुकांचे अनुषंगाने सागंली जिल्हयातील अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करण्यातबाबत आदेश दिले होते.
त्यानुसार निरीक्षक शिंदे यांनी गुन्हे अन्वेषण शाखेकडील एक पथक तयार केले होते. ते पथक कासेगाव परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पथकाला खास बातमीदारामार्फत प्रकाश निकम हा देशी बनावटीचे पिस्टल विक्री करण्यासाठी घेवून आला असून तो त्याची मारुती ओमनी कार मधुन येवून सध्या भाटवाडी ग्रामपंचायत कडे जाणा-या रोडवर बसस्थानक चौकात श्री फॅब्रिकेशन वर्क या दुकानालगत लावलेल्या मारुती व्हॅन (एम एच १० बी वाय ६६१६) यामध्ये बसलेला आहे, अशी खात्रीशिर बातमी मिळाली.
नंतर पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या गाडीची झडती घेतल्यानंतर एक देशी बनावटीचे पिस्तूल सापडले. त्याच्याकडून पिस्तुल, व्हॅन जप्त करण्यात आली.
त्याच्या विरुध्द कासेगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.