'त्यांचे' खोके बाहेर काढणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : खरा पंचनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाला 50 खोके म्हणत वारंवार डिवचले जात आहे. याच मुद्द्यावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. खोक्यांचा आरोप करणाऱ्यांचे खोके बाहेर काढू असा इशारा शिंदे यांनी एक वृत्तवाहिनिशी बोलताना दिला.
विरोधकांच्या आरोपांना कामातून उत्तर देऊ असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. खोक्यांचा आरोप करणाऱ्यांचे खोके बाहेर काढू असा इशारा यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांच्या गुवाहाटी दौऱ्यावर टीका करण्यात आली होती, या टीकेचा देखील त्यांनी यावेळी समाचार घेतला. आमदारांचं खच्चीकरण सुरू होतं, त्यामुळे हे सर्व आमदार आज माझ्यासोबत आल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
बेळगावातल्या मराठी माणसाशी नाळ जोडलेली आहे. सीमा प्रश्नासंदर्भात आंदोलन केल्यानं मी स्वत: तुरुंगात होतो. बेळगावच्या मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही. याबाबत माझी केंद्र सरकारसोबत चर्चा सुरू असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
मला ज्योतिषाला हात दाखवायच गरज नाही. ज्यांना दाखवायचा त्यांना मी चार महिन्यांपूर्वीच हात दाखवल्याचा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.