पत्नी पाठोपाठ पतीचीही आत्महत्या
औरंगाबाद : खरा पंचनामा
औरंगाबाद येथील एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. पत्नीची आत्महत्येची माहिती मिळतच पतीनेही जीवन संपविल्याने खळबळ उडाली आहे.
सिल्लोड तालुक्यातील घाटंब्री येथील एका जोडप्याचा हृदयद्रावक शेवट झाला. विकास तायडे आणि सपना तायडे असे या दाम्पत्याचे नाव आहे. विकास तायडे आणि सपना तायडे यांचे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. पत्नी सपना हिने सकाळी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी पती विकास कामानिमित्त सिल्लोड शहरात गेला होता.
त्याला पत्नीची आत्महत्येची माहिती कळताच त्यानेही टोकाचे पाऊल उचलले. विकासने रस्त्याने येताना अंबईजवळील बोरगाव येथील खेळण्या नदीच्या पुलावर गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, या दोघांनी आत्महत्या का केली हे अजून समजू शकले नाही. याप्रकरणी अजिंठा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.