Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कराड उपजिल्हा रूग्णालयात बोगस डाॅक्टरला अटक

कराड उपजिल्हा रूग्णालयात बोगस डाॅक्टरला अटक



कराड : खरा पंचनामा

कराड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात डॉक्टर म्हणून फिरणाऱ्या एकाला पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले. सुहास गोरवे (वय 27, रा. दुशेरे, ता. कराड) असे त्या बोगस डॉक्टरचे नाव आहे. 

याबाबत उपजिल्हा रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक निलेश शंकर माने यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात सोमवारी सकाळी एकजण डॉक्टरसारखे पांढरे आप्रण व ओळखपत्र घालून फिरत असल्याचे सुरक्षारक्षकाला दिसले. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे त्याने ही बाब लिपिक माने यांना सांगीतली. 

माने यांनी आवारात जाऊन पाहिले असता संबंधित व्यक्ती डॉक्टर असल्याच्या अविर्भावात फिरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच त्याच्या गळ्यात महाराष्ट्र शासन, राष्ट्रीय आरोग्य अभियान असे लिहीलेले ओळखपत्र होते. संशय वाटल्यामुळे लिपिक माने यांनी संबंधिताकडे विचारणा केली असता, मी सोनवडी आरोग्य केंद्रात अधिपरिचारक आहे, असे त्याने सांगितले.

संशय बळावल्याने लिपिक माने यांनी अधिक विचारपूस केली असता. संबंधिताने मी सदरचे ओळखपत्र सातारच्या जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर एका झेरॉक्स सेंटरमधून बोगस तयार करुन घेतल्याचे सांगितले. ती व्यक्ती बोगस डॉक्टर म्हणून फिरत असल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर पोलीसही त्याठिकाणी पोहोचले. याबाबत कराड शहर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.