Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बहिणीची सोयरीक मोडल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणाचा खून

बहिणीची सोयरीक मोडल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणाचा खून 



लातूर : खरा पंचनामा 

बहिणीची सोयरीक मोडल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला. यावेळी झालेल्या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना लातुर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथे घडली. 

औराद शहाजनी येथील अखिल जलील बेलुरे (२५) व त्याचा मित्र बबलू लायक भातांब्रे (२४) हे दोघेजण अखिलच्या बहिणीची सोयरिक मोडल्या कारणास्तव जाब विचारण्यासाठी लातूर-जहिराबाद या महामार्गारावर फळ विक्री करणाऱ्या बबलू महेताबसाब बागवान (२५) याच्याकडे गेले होते. यावेळी त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. 

बबलू बागवान यांने नारळ सोलण्याच्या कोयत्याने अखिल आणि भातांब्रे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात अखिल व भातांब्रे गंभीर जखमी झाले. अखिल बेलुरे यास पुढील उपचारासाठी निलंगा येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तसेच बबलू भातांब्रे यास येथील शासकीय रुग्णालयामध्ये प्रथमोपचार करण्यात आले. याप्रकरणातील हल्लेखोरही जखमी झाला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.