अविश्वास ठरावावर विरोधी पक्षनेत्याची सहीच नाही!
नागपूर : खरा पंचनामा
सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन विविध मुद्द्यांनी वादळी ठरत आहे. अशी स्थिती असतानाच, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात महाआघाडीचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. महाविकास आघाडीकडून आता अध्यक्ष नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रस्तावाच्या पत्रावर विरोधीपक्षनेते अजित पवार यांचीच सही नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
अविश्वास प्रस्तावाबाबत ३९ आमदारांचं पत्र महाविकास आघाडीकडून विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांना देण्यात आल आहे. आमदारांना अधिवेशनामध्ये बोलू न दिल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे. काँग्रेसचे नेते सुनील केदार, शिवसेनेचे नेते सुनील प्रभू, सुरेश वरपुडकर, अनिल पाटील यांनी हे पत्र सचिवांना दिलं आहे. मात्र या पत्रावर अजित पवार यांचीच सही नसल्याची माहिती मिळत आहे.
या प्रस्तावाबाबत पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.