Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

साहेबांनी दिले जेवणाचे बिल; कर्तव्यावरील कर्मचारी झाला अवाक!


साहेबांनी दिले जेवणाचे बिल; कर्तव्यावरील कर्मचारी झाला अवाक!


खरा पंचनामा : सांगली


सांगली जिल्ह्यात नव्यानेच रुजू झालेल्या एका मोठ्या अधिकाऱ्यांनी कामाचा चांगलाच ठसा उमटवला आहे. ते अजून शासकीय निवासस्थानाच्या प्रतिक्षेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचे काही मित्र सांगलीत आले होते. त्यावेळी साहेबांनी त्यांच्या सुरक्षेसाठी कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्याला मित्रांच्या जेवणाची सोय करण्यास सांगितले. त्यावेळी त्या कर्मचाऱ्याने त्याच्या बिलाबाबत शाडो अधिकाऱ्यांना सांगू का असे विचारले.

त्यानंतर साहेबांनी त्याचे कारण विचारले. त्यावर त्या कर्मचाऱ्याने यापूर्वीचे साहेब शाडो अधिकाऱ्यानाच अशी कामे सांगत होते असे उत्तर दिले. त्यानंतर नवीन आलेल्या साहेबांनी त्यांना अशी कामे सांगायची नाहीत असे सांगितले. नंतर साहेबांनी स्वतःच्या खिशातून पैसे काढून दिले आणि बिल भागव अशी थेट ऑर्डरच दिली. ही घटना मात्र कोणालाच कळाली नाही.

पण या घटनेमुळे नवीन साहेबांनी शाडो अधिकाऱ्याला बाजूलाच ठेवल्याची चर्चा आहे. त्यामुळे शाडो अधिकारी आणि त्यांची संपूर्ण टीम खूपच चिंतेत असल्याची जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे.


कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.