बिरेंद्र सराफ राज्याचे नवे महाधिवक्ता
मुंबई : खरा पंचनामा
ज्येष्ठ वकील डॉ बिरेंद्र सराफ यांची महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजुरी दिली आहे.
महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी दिलेला राजीनामा राज्य सरकारने स्विकारला असून मंत्रिमंडळ बैठकीत सराफ यांच्या नावाची शिफारस करण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारकडून बिरेंद्र सराफ यांचे नाव महाधिवक्तापदी निश्चित करण्यात आले. आज राज्यपालांनी सराफ यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली.
सराफ गेल्या 25 वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत आहेत, मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून त्यांनी पदवी प्राप्त केली. कनिष्ठ वकील म्हणून त्यांनी विद्यमान सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांच्या चेंबरमध्ये काम केले. तर सराफ यांची 2020 मध्ये ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
त्यांनी सहा वर्षे बॉम्बे बार असोसिएशनचे सचिव म्हणून काम केले आणि सध्या ते उपाध्यक्ष आहेत. बिरेंद्र सराफ यांनी त्याच्या कारकिर्दीत, त्यांनी अनेक हाय-प्रोफाइल आणि वादग्रस्त प्रकरणे हाताळली आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.