Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीची थेट महासंचालकांकडे तक्रार

पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीची थेट महासंचालकांकडे तक्रार



मुंबई : खरा पंचनामा

महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे पोलिस अधिकाऱ्याचा पत्नीने थेट तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. 

मागील तेरा वर्षापासून दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याच्या कारणावरुन पती मानसिक व शारीरिक छळ करत असल्याची तक्रार या महिलेने केली आहे. संबंधित महिलेने ट्विटद्वारे ही तक्रार केली आहे.

सचिन कांबळे असे तक्रार करण्यात आलेल्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांची पत्नी सई कांबळे यांनी पोलिस महासंचालकाकडे ट्विट करुन तक्रार दाखल केली आहे. सचिन कांबळे हे मुंबई पोलीस दलात उपनिरीक्षक आहेत. पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने थेट तिच्या पती विरोधात महाराष्ट्र पोलीस महासंचालकांकडे तक्रार केल्याने हा चर्चेला विषय ठरला आहे.

सई कांबळे यांनी आपले पती सचिन कांबळे यांच्याविरोधात बोरिवलीच्या एम एच बी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या, पण याठिकाणी तक्रार घेण्यास पोलिसांनी नकार दिला. त्यामुळे सई कांबळे यांनी ट्विट करुन तक्रार केली. यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.