दारुसाठी पैसे न दिल्याने मजुराचा खून
पुणे : खरा पंचनामा
दारुसाठी पैसे न दिल्याने साथीदार मजूराच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन खून करण्यात आला. पुचु मनधुवा मुरमु (वय ४९, रा. कुमार पॉप्रर्टिज साईट, मगरपट्टा) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी संजय कुनु चौरसिया (वय १९, रा. लेबर कॅम्प, मगरपट्टा, मुळ उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे.
याप्रकरणी सद्दाम हुसेन (वय ३१, रा. केशवनगर, मुंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.
पुचु व संजय हे दोघे अॅमनोरा मॉलच्या बाजूला असलेल्या कुमार प्रॉपर्टीज यांच्या बांधकाम साईटवरील लेबर कॅम्पमध्ये राहतात. दोघेही फिर्यादीकडे लेबर काम करीत असत. संजय हा नेहमी दारुसाठी पैसे मागत असे. पैसे दिले नाही तर तो पुचु याला मारहण करीत असल्याचे त्याने फिर्यादी यांना सांगितले होते.
सोमवारी मध्यरात्री संजय याने पुचु याच्याकडे दारुसाठी पैसे मागितले होते. त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात संजय याने बाजुला पडलेल्या लोखंडी रॉडने पुचु यांच्या डोक्यात मारुन त्याचा खून केला.
याची माहिती सोमवारी सकाळी पावणेनऊ वाजता पोलिसांनी मिळाली.
पोलिसांनी शोध घेऊन संजय चौरसिया याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक कविराज पाटील अधिक तपास करीत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.