शिंदे, फडणवीस यांना कर्नाटकतील विजय महत्वाचा!
नागपूर : खरा पंचनामा
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अधिवेशन काळापर्यंत निलंबित केल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. आता जयंत पाटील यांनी शुक्रवारी सीमावादावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. कर्नाटक येथील आगामी निवडणुकीत शिंदे, फडणवीस यांना भाजपचा विजय महत्वाचा आहे अशी टीका जयंत पाटील यांनी ट्विटरवरून केली आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक राज्याच्या विधानसभेत 'बेळगावसह सर्व सीमांचे रक्षण करून महाराष्ट्र राज्याने तयार केलेल्या बेळगाव वादाचा निषेध करण्याचा करण् याचा ठराव' करूनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री साप चावल्याप्रमाणे गप्प बसले आहेत, असेही जयंत पाटील यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
मराठी भाषिकांवर अन्याय होऊनही महाराष्ट्राचे शिंदे फडणवीस सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. दिल्लीने डोळे वटारल्यामुळे यांच्या तोंडातून शब्दही बाहेर निघत नाहीये.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आता तरी नेभळटपणा सोडून आपल्या विधानसभेत कर्नाटकच्या सरकार आणि मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधाचा ठराव मांडावा. कर्नाटक राज्याच्या येणाऱ्या निवडणुकांतील भाजपचा विजय हा शिंदे फडणवीस यांना जास्त महत्वाचा वाटत आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.