सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहित चौधरीना विशेष सेवा पदक जाहीर
मुंबई : खरा पंचनामा
नक्षल प्रभावित संवेदनशील आणि दुर्गम भागात कर्तव्य बजावल्यामुळे राज्यातील अधिकारी, कर्मचारी यांना शासनाने विशेष सेवा पदक जाहीर केले आहे. यामध्ये 1412 जणांचा समावेश आहे. सांगली शहरातील तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक आणि सध्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहित उत्तरेश्वर चौधरी यांचाही यामध्ये समावेश आहे.
2012 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर श्री चौधरी यांनी पोलीस खात्यात सेवा सुरू केली. त्यानंतर 2013 पासून 2016 पर्यंत त्यांनी गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागात उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावली. 2016 ते 2019 या काळात त्यांनी सांगली जिल्ह्यात सेवा बजावली. त्यानंतर ते 2021 पर्यंत पुण्यातील विशेष सुरक्षा विभागात कार्यरत होते. 2022 पासून ते सोलापूर शहरात कर्तव्य बजावत आहेत.
श्री चौधरी मूळचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील उमरड गावचे आहेत. त्यांना विशेष सेवा पदक जाहीर झाल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.