जेवणासाठी दीड हजार 'फोन पे'वर मागणाऱ्या पोलिसाला अटक
औरंगाबाद : खरा पंचनामा
दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली. त्याशिवाय जेवणासाठी दीड हजार रुपयाची लाच 'फोन पे'वर मागितल्याने औरंगाबाद ग्रामीणच्या बिडकीन पोलीस ठाण्यातील एका पोलिसाला अटक करण्यात आली. तसेच यात मदत केल्याप्रकरणी एका पोलीस पाटलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराविरोधात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी या पोलीस कर्मचाऱ्याने लाच मागितली होती. तर लाचेच्या मागणीसोबतच जेवणासाठी दोन हजारांची लाच मागितली असता तडजोड अंती 'फोन पे' वरून दीड हजार रुपये घेतांना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.
विजय पवार असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर यासाठी मध्यस्थी करणारा डोंगरूनाईक तांडा गावाचा पोलीस पाटील गुलाब छगन चव्हाण विरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील तक्रारदार यांचे विरुद्ध बिडकीन पोलीस स्टेशन येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे या गुन्ह्यात फिर्यादी यांना मॅनेज करणे व गुन्ह्यात मदत मिळवून देण्यासाठी पवार याने 80 हजार लाचेची मागणी केली होती. दरम्यान 50 हजार रुपये तडजोडी अंती लाच मगितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर जेवणासाठी दोन हजार रुपये मागितले. त्यावेळी तडजोडीनंतर फोन पेवर दीड हजार रुपयांची लाच मगितल्याचे स्पष्ट झाले.
याप्रकरणात दाखल गुन्ह्याच्या तपासी अमलदार यांचे कडून दाखल गुन्हयात मदत मिळवून देण्यासाठी तडजोडीची लाचेची रक्कम ठरवण्यासाठी डोंगरूनाईक तांडा गावाचा पोलीस पाटील गुलाब छगन चव्हाण याने मध्यस्थी केली होती. पंच, साक्षीदार यांच्या समक्ष गुलाब चव्हाण याने मध्यस्थी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.