Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीच्या मिलिंद गाढवेवर पिंपरीतही गुन्हा दाखल

सांगलीच्या मिलिंद गाढवेवर पिंपरीतही गुन्हा दाखल



पिंपरी चिंचवड : खरा पंचनामा

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एका व्यक्तीस गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्या व्यक्तीच्या नावे मेटा ट्रेडर 5 यावर खाते तयार करून त्याचे नियंत्रण गुंतवणूकदाराला न देता 19 लाख 52 हजार 500 रुपयांचा अपहार केला. याप्रकरणी सांगलीतील मिलिंद बाळासाहेब गाढवे याच्यावर पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शैलेंद्रकुमार शांतीलाल मेहता (वय 45, रा. चिंचवड) फिर्याद दिली आहे. गाढवे याने लक्ष्मण शेंडे या व्यक्तीच्या मध्यस्थीने मेहता यांच्याशी
ऑनलाईन माध्यमातून संपर्क करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल. एका वर्षात गुंतवणूक केलेली रक्कम दुप्पट होईल, असे आमिष दाखवून मेहता यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले.

मेहता यांनी 19 लाख 52 हजार 500 रुपये गुंतवले असता गाढवे याने मेहता यांच्या नावाने मेटा ट्रेडर 5 यावर खाते तयार केले. त्याचे नियंत्रण मेहता यांना न देता त्यांनी गुंतवलेल्या रकमेचा गाढवे याने अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस  तपास करीत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.