सोनीत पैलवनाच्या खुनप्रकरणी तिघांना अटक
मिरज : खरा पंचनामा
सोनी (ता.मिरज) येथे मंगळवारी मध्यरात्री आकाश नरुटे या पैलवानाच्या खून प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांना आहे.
याप्रकरणी उत्तम अशोक नरुटे (वय 21)
दत्ताजी संभाजी कदम (वय 21)
सन्मेद शांतिनाथ चौगुले (वय 18, रा सर्व सोनी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सोनी गावात ग्रामपंचायत निवडणूक सुरु असून राष्ट्रवादीच्या निवडणूक प्रचारात असलेल्या आकाश यास सोमवारी रात्री त्याच्या भावकीतील उत्तम नरुटे याने बोलावून दुचाकीवर बसवून नेले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत आकाश याचा मोबाइल बंद असल्याने नातेवाइकांनी त्याची शोधाशोध केल्यानंतर रात्री बारा वाजता गावाजवळ करोली रस्त्यावर न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर कोपर्यात आकाश याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळाले. आकाश याच्या डोक्यात पाठिमागील बाजूस धारदार कोयत्याने अनेक वार केल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाल्याचे निदर्शनास आले.
त्याचे काही दिवसापूर्वी गावातील काही जणांसोबत भांडण झाले होते. त्यातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे. आकाश यास दुचाकीवर बसवून नेणार्या उत्तम नरुटे यास पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने सम्मेद चाैगुले व दत्तात्रय कदम यांच्या मदतीने आकाशचा खून केल्याची कबुली दिली. आकाश याचा निघृण खूनाच्या मागे पूर्ववैमनस्य की अन्य कोणते कारण आहे याचा तपास सुरु असल्याचे ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरिक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.