उसाची ट्रॉली उलटल्याने वाहतूक विस्कळीत!
सातारा : खरा पंचनामा
पुणे-बंगळुरू महामार्गावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली. उंब्रज जवळ हा अपघात घडला. यामुळे पूर्ण महामार्गावर ऊस पसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. या अपघातात ट्रक्टरचे मोठे नुकसान झाले आहे.
शुक्रवारी सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास तासवडे टोलनाका ते उंब्रज दरम्यान ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. परंतु ऊस सर्वत्र रस्त्यावर पसरल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.
या अपघातात ट्रक्टरच्या पुढील भागाचे तसेच ट्रॉलीचे मोठे नुकसान झाले आहे. वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत ऊस बाजूला करण्याचे काम सुरू केले. तसेच वाहतूकही व्यवस्थित करण्याचे काम केले. या अपघातानंतर लोकांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला बाजूला केले. तसेच ऊस बाजूला करण्यासाठी ऊसतोड मंजूरांना बोलावून हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यानंतर काही वेळातच वाहतूक सुरळीत झाली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.