नागपूरमध्ये अज्ञातांकडून जवानावर गोळीबार
नागपूर : खरा पंचनामा
नागपूरमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांकडून नागपूरच्या कन्हान कांद्री परिसरातील डब्लूसीएलमध्ये सुरक्षा दलाच्या जवानावर गोळीबार करण्यात आला.
मिलिंद खोब्रागडे असे गोळीबार करण्यात आलेल्या जवानाचे नाव आहे. या घटनेत मिलिंद खोब्रागडे हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून दुसऱ्याचा अजून शोध सुरु आहे.
मिलिंद खोब्रागडे हे ज्या ठिकाणी कर्तव्यावर होते. त्या ठिकाणी तिथे दोन व्यक्ती दुचाकीवरून आले. यानंतर मिलिंद खोब्रागडे आणि त्या दोन व्यक्तींमध्ये काही कारणामुळे वाद झाला. हा वाद एवढा वाढला की दुचाकीवरून आलेल्या त्या दोन व्यक्तींपैकी एकाने देशी कट्ट्यातून खोब्रागडे यांच्या दिशेने गोळी झाडली. हि गोळी मिलिंद खोब्रागडे यांच्या डोक्याला लागली आणि ते गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.