Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

संजय पांडे यांची कारागृहातून सुटका

संजय पांडे यांची कारागृहातून सुटका 



नवी दिल्ली : खरा पंचनामा 

नॅशनल स्टॉक एक्सचेंज कर्मचाऱ्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी दिल्ली कोर्टाने जामीन दिल्यानंतर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांची तिहार तुरुंगातून सुटका करण्यात आली. पांडे यांना जुलैमध्ये अटक झाल्यानंतर त्यांनी जवळपास पाच महिने तुरुंगात काढले. दिल्ली उच्च न्यायालयाने 8 डिसेंबर रोजी पांडेंना जामीन मंजूर केला होता. 

संजय पांडे 30 जून 2022 रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन निवृत्त झाले होते. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत त्यांना ईडीने नोटीस पाठवली होती. ईडीने सप्टेंबरमध्ये दिल्ली कोर्टात NSE कर्मचाऱ्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणाशी निगडीत मनी लॉड्रिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते. जुलैमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक केली होती. संजय पांडेंची या प्रकरणी सात तासांहून अधिक चौकशी झाल्यानंतर केंद्रीय तपास संस्थेने अटक केली. 

पांडेंच्या अटकेपूर्वी ईडीने याप्रकरणी एनएसईला विचारणा केली. त्यानंतर माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांना अटक करण्यात आली. विशेष न्यायालयाने पांडेंना 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सोडण्याचे आदेश दिले. तसेच पांडेंना त्यांचा पासपोर्ट सरंडर करण्याचे, त्यांचा मोबाईल नंबर तपास अधिकाऱ्यांना देण्याचे तसेच जामीन कालावधीत भारत सोडू नये असे निर्देश देण्यात आले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.