आफताबने १०० तास पाहिला जॉनी डेप आणि अँबर हर्ड यांचा खटला
दिल्ली : खरा पंचनामा
आफताबने पोलिसांना चकमा देण्यासाठी अनेक क्राइम बेवसीरिज पाहिल्या होत्या.
वसईतील श्रद्धा वालकरच्या खूनाने देश हादरला होता. तिचा प्रियकर आफताब पूनावाला याने श्रद्धाचा गळा दाबून खून केला होता. त्यानंतर श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले होते. हे तुकडे आफताबन तीन आठवडे रोज एक-एक करून मेहरोलीच्या जंगलात फेकत होता.
श्रद्धाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर आफताबला दिल्लीतील मेहरोली पोलिसांनी अटक केली होती. आता आफातबच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे होत आहे. श्रद्धाच्या हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी आणि पोलिसांना चकमा देण्याकरता आफताबने क्राइम सीरिज आणि चित्रपट पाहिले होते. मोबाईल आणि लॅपटॉपवर तो असे चित्रपट पाहत होता, अशी माहिती समोर आली होती.
त्यात श्रद्धाचा खून केल्यावर आफताब कायद्याचे डाव-पेच जाणून घेण्यासाठी हॉलीवूडचा एक प्रसिद्ध खटला पहात होता, अभिनेता जॉनी डेप आणि त्याची आधीची पत्नी अँबर हर्ड यांच्यातील मानहानीचा. पोलिसांनी आफताबच्या इंटरनेटची हिस्टरी पाहिल्यावर ही गोष्ट समोर आली. आफताबने जॉनी डेप आणि अँबर हर्ड यांचा मानहानीचा खटला अनेकवेळा वाचला होता. तसेच, त्यांची न्यायालयात सुरु असलेली सुनावणीही त्याने लाइव्ह पाहिली होती. तब्बल १०० तास हा मानहानीचा खटला आफताबने पाहिला होता.
काय आहे जॉनी डेप आणि अँबर हर्ड खटला?
२०१८ मध्ये ‘वॉशिग्टन पोस्ट’मधील एका लेखात हर्डने डेपवर गंभीर आरोप केले. आपण कौटुंबिक हिंसाचाराने पीडित असून जॉनीने आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप या लेखात करण्यात आला. हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर जॉनी डेपने अँबरने माझी बदनामी केल्याचा आरोप करून तिच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आणि पाच कोटी डॉलरची मागणी केली.
त्याविरोधात अँबरनेही शारीरिक हिंसा आणि छळाचा दावा करत १० कोटी डॉलरची मागणी केली. सहा आठवडे हा खटला चालला. त्यात अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले. अखेर न्यायालयाने डेपची बाजू योग्य असल्याचे सांगत हर्डला १.५ कोटी डॉलरची भरपाई देण्याचे आदेश दिले. त्याशिवाय न्यायालयाने डेपलाही दंड सुनावला आहे. हर्डच्या काही मानहानीसाठी तो दोषी आढळला असून त्याला २० लाख डॉलरची भरपाई देण्यास सांगण्यात आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.