मुख्यमंत्र्यांचा विषय त्यांच्या सध्याच्या समर्थकानीच मांडला!
नागपूर : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर हिवाळी अधिवेशन कालावधीत निलंबनाची कारवाई झाल्यामुळे विरोधक प्रचंड आक्रमक झाले आहेत. यावर अजित पवारांनी देखील प्रतिक्रिया दिलीये. मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर आता करण्यात आलेले आरोप त्यांच्याच सध्याच्या सहकाऱ्यांनी यापूर्वीच केल्याचे पवार म्हणाले.
पवार म्हणाले, सत्ताधाऱ्यांची सहा महिन्यांपासून मुजोरी सुरु आहे. सत्ताधाऱ्यांच्या तक्रारी उचलून धरल्या जातात तर विरोधकांच्या दाबल्या जातात. अजित पवारांनी यावेळी मोठा गौप्यस्फोट केला. एकनाथ शिंदेंविरोधातला घोटाळ्याचा आरोप कुणी उघड केला हे अजित पवारांनी यावेळी सांगितले.
अजित पवारांच्या वक्तव्यामुळे आता एकनाथ शिंदे गट आणि भाजपमध्ये येत्या काळात मोठी ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
संजय राऊत यांनीही काल झालेल्या पत्रकार परिषदेत हा गौप्यस्फोट केला. दीड महिन्यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, आणि नागोराव गाणार या विदर्भातल्या आमदारांनीच या विषयावर या विदर्भातल्या आमदारांनीच या विषयावर तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. तोच विषय आम्ही घेतला, असं म्हटलं होतं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.