हिवाळी अधिवेशनात आमदार, कर्मचाऱ्यांना सर्दी, खोकला; आरोग्य यंत्रणा सतर्क
नागपूर : खरा पंचनामा
महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपुर येथे सुरु आहे. सोमवारपासून अधिवेशन सुरु झालं आहे. अधिवेशना मध्ये काही आमदार आणि कर्मचाऱ्यांना सर्दी, खोकला झाल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे 30 आमदारांसह 611 जणांची आरोग्य तपासणी होणार आहे. यामध्ये 15 आमदारांना सर्दी, खोकला झाला आहे. तर काही आमदारांना मधुमेह आणि उच्चरक्तदाब देखील आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे. यामुळे राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
कोरोनाच्या दोन वर्षांच्या संकटानंतरचं नागपूरमध्ये हे पहिलंच अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाचे नियोजन जवळपास 14 दिवसांचे आहे. यंदाचं हिवाळी अधिवेशन चांगलंच वादळी ठरल असल्याचं दिसून येत आहे. विरोधकांनी एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सध्या जगाला धडकी भरवणारा कोरोना जिथून आला त्याच चीनमध्ये पुन्हा एकदा या व्हायरसने डोके वर काढले आहे. आणि त्याच पार्श्वभुमीवर भारतात देखील खबरदारीचे उपाय राबवण्यात येत असून, आरोग्य प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.