कोल्हापुरमध्ये वरातीत नवरदेवाचा गोळीबार
कोल्हापूर : खरा पंचनामा
कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील सडोली या ठिकाणी एका वरातीत नवरदेवाने चक्क बारा बोअरच्या बंदुकीने हवेत गोळीबार केला. अतिउत्साहाच्या भरात गोळीबार करणे या नवरदेवाला चांगलेच भोवले आहे. या गोळीबार प्रकरणी नवरदेव अजयकुमार पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये नवरदेवाच्या आसपास भरपूर गर्दी आहे. हे सर्व लोक वरातीमध्ये नाचण्याचा आनंद घेत आहे. काही तरुणांनी नवरदेवाला आपल्या खांद्यावर उचललं आहे. नवरदेवाच्या हातामध्ये बंदुक आहे आणि तो याने हवेत गोळीबार करत आहे. वरातीत उपस्थित असणाऱ्याच कोणीतरी हवेत गोळीबार केलेल्या या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला.
या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी नवरदेव अजयकुमार पवार याच्याविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.