अंबाजोगाई-लातूर महामार्गावर भरधाव कार ट्रॅक्टरवर आदळली, तिघांचा मृत्यू
बीड : खरा पंचनामा
अंबाजोगाई-लातूर महामार्गावर कार आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर पोखरी फाटा इथं आणखी एक अपघाताची घटना घडली असून 5 जण जखमी झाले आहे.
बबन प्रभू राठोड (वय ४५, बिटरगाव, ता. रेणापूर), नंदू माणिक राठोड (वय ३३, बिटरगाव, ता. रेणापूर), राहुल सुधाकर मुंडे (वय ३१, वंजारवाडी, ता. रेणापूर) अशी तिघा मृतांची नाव आहे.
बर्दापूरजवळ रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या उसाच्या ट्रॅक्टरवर भरधाव कार आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये कारचा चुराडा झाला. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत पावलेले तिघेही रेणापूर येथील आहेत.
हे दोन्ही अपघात एकाच रस्त्यावर एक तासाच्या फरकांनी झाले असून ऊसाच्या ट्रॅक्टरला रिफलेक्टर नसल्याने हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
तर, दुसरा अपघात महामार्गावरिल पोखरी फाटा येथे टेम्पो, कार आणि ऊसाच्या ट्रॅक्टरचा अपघात झाला. या अपघातात पाच जण जखमी झाले त्यांच्यावर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.