आईने चिमुकल्यासह घेतली उडी; मुलगा वाचला
नवी मुंबई : खरा पंचनामा
पाच वर्षांच्या मुलासह आईने सात मजली इमारतीच्या छतावरून उडी मारल्याची घटना कोपरखैरणे घडली. यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तिच्या मुलाचा जीव थोडक्यात वाचला.
सासरच्या छळाला कंटाळून महिलेने हे कृत्य केले. याप्रकरणी तिच्या सासरच्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली आहे.
कोपरखैरणे येथील न्यू रावची इमारतीमध्ये ही घटना घडली. आरती मल्होत्रा (३९) असे मृत महिलेचे नाव आहे. ती पती विजेंद्र मल्होत्रा, सासू किरण, नणंद अंजली यांच्यासह रहात होती. २०१६ मध्ये तिचे लग्न विजेंद्रसोबत झाले होते. लग्नानंतर तिचा सतत छळ सुरू होता. त्याला कंटाळून अखेर सोमवारी तिने पाच वर्षांचा मुलगा अर्विक याला कवटाळून सात मजली इमारतीच्या छतावरून उडी मारली.
त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा थोडक्यात बचावला. त्याच्या चेहऱ्याला व पायाला दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तिच्या आत्महत्येनंतर भाऊ विशाल शर्मा याने बहिणीच्या सासरच्यांविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे.
सात मजली इमारतीवरून पडूनही सुदैवाने पाच वर्षांच्या अर्विकचे प्राण वाचले आहेत. उपचारादरम्यान मामा त्याच्या भेटीसाठी गेला असता त्याने 'आई रडत होती, म्हणाली देवाघरी जायचे...आणि आम्ही इमारतीवरून उडी मारली' असे सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.