ते गेले कर्तव्यावर; झारीतील ते शुक्राचार्य मात्र शहरातच
सांगली : खरा पंचनामा
नवीन साहेबांनी सांगलीत रुजू होताच नावाजलेल्या लोकांना कर्तव्य बजावण्यासाठी शहरातून दूर पाठवले आहे. त्यांच्या नवीन कर्तव्याची चर्चा अजूनही सांगली, मिरजेत सुरू आहे. मात्र कर्तव्यावर गेलेल्यांशीवाय काही झारीतील शुक्राचार्य अजून सांगली, मिरजेत ठाण मांडून आहेत. त्यामुळे साहेबांना संबंधित लोकांनी योग्य माहिती का दिली नाही असा प्रश्न खात्यातील लोकांकडून विचारला जात आहे.
सांगली शहरात येण्यासाठी काही महिन्यांपूर्वी एकाने *'घाट'* घातला होता. तासगावमध्ये असताना लाच लुचपतच्या जाळ्यातून दोनदा निसटला होता. त्याशिवाय त्याच्याविषयी अनेक तक्रारीही आहेत. असे असूनही त्याला सांगली शहरात पाठवण्यात आले. शहरात आल्यानंतर त्याने *मूकद्दर का सिकंदर* असलेल्या साहेबांना खूपच विश्वासात घेतले.
त्यानंतर साहेबांनी त्याच्याकडे *कारभार* सोपवला. कारभार हाती येताच त्याचा वट वाढला. मग त्याने महिन्याच्या बिदगीसह उंची वस्तू मागण्याचा सपाटाच लावला. कारभार करताना त्याने साहेबांना अंधारात ठेवून शहरात व्यवसाय वाढवला. अन त्यातूनच पुढे अनेक प्रश्न निर्माण झाले.
सांगलीतील *घाट* घालणाऱ्या अशा शुक्राचार्य बरोबरच मिरजेतही काही शुक्राचार्य अजूनही आहेत. त्यांना कर्तव्यावर का पाठवले जात नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.