भाजपच्या नेत्यासह नगरसेवकावर गुन्हा दाखल
नाशिक : खरा पंचनामा
भाजपचा प्रदेश पदाधिकारी विक्रम नागरे आणि भाजपचा नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यावर नाशिक जिल्ह्यातील घोटी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
विक्रम नागरे यांनी दिलेल्या खंडणी आणि जीवे मारण्याच्या तक्रारीतील संशयित आरोपीनेच आत्महत्या करून सुसाईड नोट लिहिली आहे. सातपुर पोलीस ठाण्यात विक्रम नागरे यांनी महिनाभरात दोन तक्रारी केल्या होत्या. ज्यामध्ये खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे नमूद होते. याच दरम्यान विक्रम नागरे यांच्या घरावर हल्ला झाला होता, जवळच असलेला बॅनरही फडण्यात आला होता.
त्यावरून सराईत गुन्हेगार असलेल्या टोळीवर खंडणी आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल झाला होता.
त्यामध्ये आत्महत्या केलेल्या अनिरुद्ध शिंदे याचाही तक्रारीत समावेश होता. अनिरुद्ध शिंदे हा सराईत गुन्हेगार होता, त्याच्यावर विक्रम नागरे यांनी सातपुर पोलीस ठाण्यात खंडणी आणि जीवे मारण्याच्या तक्रारीत अनिरुद्ध शिंदे याच्या नावाचाही समावेश होता.
अनिरुद्ध शिंदे याने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती, त्यामध्ये विक्रम नागरे आणि मुकेश शहाणे या दोघांनी खोटे गुन्हे दाखल करण्यास लावून त्रास दिल्याने आत्महत्या करीत असल्याचे म्हंटले आहे.
रात्री उशिरा शिंदे याच्या मृतदेहासह नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते, त्यानंतर रात्री उशिरा विक्रम नागरे आणि मुकेश शहाणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.