Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जमीन खरेदी फसवणूक; तिघांना अटक

जमीन खरेदी फसवणूक; तिघांना अटक



सांगली : खरा पंचनामा 

मिरज तालुक्यातील कवलापूर-रसूलवाडी रस्त्यावरील जमीन खरेदी करून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ३१ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी आणखी तिघांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. 

वृषभ बाबगोंडा, भरत बाबगोंडा, सन्मती बाबगोंडा (सर्व रा. कोथळी, ता. चिकोडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तिघांनाही दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तिघेही बनावट मालक म्हणून उभे राहिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. 

याप्रकरणी एका नेत्याचा अंगरक्षक असलेला पोलिस शिपाई कृष्णदेव पाटील, विनायक सुतार, अरविंद पाटील आणि सुधीर उर्फ भैय्या शिंगाटे यांच्यांच्यावर गुन्हा नोंद झाला होता. 

त्यापैकी पोलिस कृष्णदेव पाटील, विनायक सुतार, अरविंद पाटील यांना अटक केली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.


पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी जयदेव काळे यांची जानेवारी २०१८ मध्ये संशयितांशी त्यांची ओळख झाली. यावेळी चौघांनी संगनमत करून रसूलवाडी येथे असणाऱ्या स्मशानभूमीच्या उत्तरेकडील आठ एकर १६ गुंठे शेतजमीन विक्रीसाठी काढली आहे. शेतजमीन खूप चांगली असून ती दोघांत घेऊ, असे सांगितले. विजय चव्हाण यांना दोघांत व्यवहार करू, असे सांगून मूळ मालकांना दोघांसमोर बोलावून चर्चा करू, असे सांगितले. 

त्याप्रमाणे संशयित चौघांनी शेतजमिनीवर असलेल्या करारपत्रावर अमित मुळे, अभिजित मुळे, आशालता मुळे, जिवंधर मुळे, सुकुमार मुळे, उत्तम मुळे, युगंधर मुळे, चंद्रकांत मुळे यांची छायाचित्रे लावली होती.

वास्तविक शेतजमिनीचे मुळे मूळ मालक नव्हते. मात्र, मुळे हेच शेतजमिनीचे मालक आहेत, अशी ओळख त्यांनी यावेळी करून दिली. ठरविलेल्या जमिनीसाठी ३१ लाख रुपये घेतले. त्यानंतर संशयितांनी चार महिन्यांत व्यवहार पूर्ण करतो, असे आश्‍वासन दिले. जमिनीवर असलेला बोजा कमी केल्याचा बनावट दाखला त्यांनी तयार करून दाखवला. त्यानंतर काही महिन्यांतच फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच काळे यांनी पैसे परत मागत तगादा लावला. 

त्यानंतर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. पोलिसांनी एका पोलिसासह तिघांना यापुर्वी अटक केली होती. आता आईसह दोन मुलांना अटक करण्यात आली. बोगस कागदपत्रा आधारे मूळ मालक असल्याचे भासवले होते. पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप शिंदे, महेश जाधव यांच्यासह पथक तपास करत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.