भावोजीचा खून करून मेहुण्याचा जल्लोष
औरंगाबाद : खरा पंचनामा
बहिणीसोबत पळून जाऊन लग्न केल्याच्या रागातून भावोजीवर भर रस्त्यात कुऱ्हाडीने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर दहेगाव बंगला येथे गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. भावोजीचा खून केल्यानंतर मेहण्याने जल्लोष केल्याचे प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितले.
बापू खिल्लारे (वय ३४) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी वाळूज पोलिसांनी दोनच तासातच सचिन श्यामराव नाटकर (वय २४) याला अटक केली. मृत बापू खिल्लारे याने आरोपी सचिन नाटकर याच्या बहिणीसोबत काही वर्षा पूर्वी पळून जाऊन आंतरजातीय प्रेम विवाह केला होता.
विवाहनंतर त्यां दोघांना एक मुलगा झाला मात्र काही महिन्यातच तो आजारपणाने मृत झाला यादरम्यान मृत बापूचे आपल्या पत्नी सोबत बिनसले तेव्हा पासून ती आपल्या पती पासून वेगळी राहत होती. तर बापू आपल्या भावासोबत त्याच्या सासरवडीत सांरगपुर (ता. गंगापूर) येथे मागील दोन महिन्यांपासून राहून हुरडा विकण्याचा व्यवसाय करीत होता.
बापू मुळेच आपल्या बहिणीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले हा राग मनात ठेवून सचिनने बापूला गाठले व कुऱ्हाडीचा घाव घालून संपविले. सचिन नाटकर हा गुरुवारी दुपारी श्रीरामपूर येथून विना क्रमांकाच्या दुचाकीवर जॅकेट घालून जॅकेट मागे कुऱ्हाड लपून आला होता; देहेगाव बंगला येथे बापू दुपारी साडे चारचा सुमारास एका हॉटेल मधून चहा घेऊन बाहेर येताच त्या ठिकाणी पाळत ठेवून बसलेल्या सचिनने जॅकेट मध्ये लपवलेली कुऱ्हाड काढून बापूला गाठले.
यावेळी आपल्यावर अचानक हल्ला झाल्याने बापूला काही समजण्याच्या आतच आरोपी सचिनने भर रस्त्यावर त्याच्यावर कुऱ्हाडीने वार केले मृत बापूच्या हाताला अगोदरच जखम झालेली असल्याने त्याच्या हाताला प्लॅस्टर होते त्यामुळे त्याला स्वतःचा बचाव करता आला नाही व त्याला पळता देखील आले नाही. भावोजीचा मुडदा पडल्यानंतर मेहुण्याने जल्लोष केल्याचे सांगण्यात आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.