Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वादग्रस्त आरटीओ अधिकाऱ्याने घेतल्या शिंदे गटातील मंत्र्यांच्या भेटी!

वादग्रस्त आरटीओ अधिकाऱ्याने घेतल्या शिंदे गटातील मंत्र्यांच्या भेटी!



नागपूर : खरा पंचनामा

आरटीओतील वादग्रस्त अधिकारी बजरंग खरमाटे यांच्यावर बेहिशेबी संपत्ती तसेच तत्कालीन मंत्र्यांशी असलेले संबंध यावरून गंभीर आरोप करण्यात आले होते. याप्रकरणी आरटीओ मधील भ्रष्टाचार प्रकरणात खरमाटे यांच्यावर आयकर विभाग आणि केंद्रीय तपास यंत्रणांचे छापे पडले होते. बजरंग खरमाटे हे नागपूर अधिवेशनात दिसल्याने पुन्हा ते चर्चेत आले आहेत. ते कोणत्या कारणासाठी तेथे गेले होते हे अद्याप समजू शकले नाही. दरम्यान त्यांनी शिंदे गटातील काही मंत्र्यांच्या भेटी घेतल्याची चर्चा आहे.

खरमाटे हे ठाकरे गटाचे महत्वाचे नेते अनिल परब यांच्या अत्यंत जवळचे मानले जायचे. नागपुरमध्ये सुरु असलेले अधिवेशन पहिल्यादिवसापासून वेगवेगळ्या मुद्द्यामुळे चर्चेत आले आहे. अशातच अनिल परबांचे निकटवर्तीय आरटीओ मधील भ्रष्टाचार प्रकरणातील माजी अधिकारी खरमाटे हे नागपुरातील अधिवेशनात शिंदे गटातील काही मंत्र्यांसोबत दिसल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

दरम्यान खरमाटे यांच्यावर आयकर विभाग आणि केंद्रीय तपास यंत्रणांचे छापे पडले होते. खरमाटे यांनी अधिवेशनात काही राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्याची माहितीसमोर आली आहे. विशेष म्हणजे खरमाटे यांच्या सोबत आरटीओचे एक निरीक्षक देखील उपस्थित होते.

2021 मध्ये आरटीओचे अधिकारी असणारे बजरंग खरमाटे यांच्यावर ईडीने कारवाई करत त्यांची 8 तास चौकशी केली होती. खरमाटे यांच्यावर अशाच प्रकारच्या प्रकरणांमध्ये दोन वेळा आरोप झाले होते. आरटीओ विभागातील बदल्या आणि पदोन्नतीसंदर्भात ईडीने त्यांची चौकशी केली होती.

खरमाटे यांच्याविरोधात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सांगली जिल्ह्यात धडक मारली होती. खरमाटे यांची तासगाव तालुक्यातील जमीन, बंगला यावर जोरदार टीका केली होती. शिवाय सोमय्या यांनी त्यांच्या सांगली जिल्ह्यातील बेहिशेबी संपत्तीबाबत गँभीर आरोपही केले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.