मुंबई, पनवेलमध्ये बनावट दारू जप्त; तिघांना अटक
मुंबई : खरा पंचनामा
मुंबई सेंट्रल, पनवेल येथे बनावट दारू निर्मिती करणाऱ्या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापे टाकून तिघांना अटक केली. यामध्ये सुमारे साडेआठ लाखांचा बनावट दारू साठा जप्त करण्यात आली आहे.
राज अशोक वाघेला (वय २०), रमेश परनेश्वर तियर (वय 35), निशांत नारायण केके (वय 30) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मुंबई सेंट्रल येथील कामाठीपुरा येथे बनावट विदेशी दारू तयार केली जात असल्याची माहिती उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर तेथे छापा टाकून विदेशी बनावट दारूच्या बाटल्या, भारतीय बनावट दारूच्या बाटल्या, मोबाईल, दुचाकी असा 1 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी राज वाघेला याला अटक करण्यात आली.
वाघेला याच्याकडे अधिक चौकशी केल्यावर पनवेल येथील उलवे येथे छापा टाकून रमेश तियर, निशांत केके यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 7 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिघांकडून एकूण साडेआठ लाखांचा बनावट दारूचा साठा जप्त करण्यात आला.
उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी, कोकण विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, मुंबई शहरचे अधीक्षक प्रविण कुमार तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जनार्दन खिल्लारे, निरीक्षक आनंद पवार, दुय्यम निरीक्षक अमोल पराडकर, दुय्यम निरीक्षक विनोद जाधव, श्रीमती श्रुती कानडे, श्रीमती प्रज्ञा राणे, जवान योगेश यादव, विशाल रणपिसे, सचिन पवार, विलास चौधरी, विनोद अहीरे, जी. डी. पवार यांनी कारवाई केली.
गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक जनार्दन खिल्लारे करीत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.