अजितदादा-फडणवीसांची मजेशीर जुगलबंदी!
नागपूर : खरा पंचनामा
विधानसभेत अजित पवारांनी आज अनेक विषयांवर चर्चा केली व कोण मुख्यमंत्री झाले, असं अजित पवार म्हणाले. मात्र, मला या गोष्टीचं अतिशय दुःख आहे की, संधी असतानाही अजितदादांना शरद पवारांनी मुख्यमंत्री पद का दिले नाही. ती संधी त्यांना २००४ यावर्षी होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून आले होते. ज्याचे जास्त उमेदवार त्याचा मुख्यमंत्री असा तुमचा फॉर्म्युला होता. तरी पण मुख्यमंत्री पद तुम्हाला मिळाले नाही, असा उपरोधिक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. गुरुवारी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात अजितदादा आणि फडणवीस यांच्यात मजेशीर जुगलबंदी रंगली. त्यामुळे सभागृहात हास्याचे फवारे उडत होते.
अजितदादा म्हणाले होते की, एकदा अमृताशी बोलणार आहे. परंतु दादा असं बोलताना तुम्ही तरी सुनेत्राताईंना विचारलं होतं का? असा प्रतिप्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी केला. तुम्ही मंत्रिमंडळात एकाही महिलेला मंत्रिपद दिले नाही. याविषयी अमृता वहिनींना सांगू का? असे अजित पवार म्हणाले होते. त्याच्या प्रत्युत्तरादाखल फडणवीस यांनी सुनेत्राताईंना सांगू का असे उत्तर दिले.
विरोधी पक्षनेते अजित पवारांचे बोलणे नेहमीच कडक आणि रोखठोक असते. परंतु, यावर्षी अजित पवारांचे भाषण आहे असे वाटले नाही. त्यामध्ये अर्धेअधिक जयंत पाटील यांचेच वाटले. सभागृहात जयंत पाटील नसतानाही तुमच्या भाषणात त्यांनी लिहिलेलं आहे की काय, असे तुमच्या भाषणातून जाणवत होते. मी वीजतोडीचा जीआर ट्विटदेखील केला आहे. याबरोबर फेसबुकरही शेअर केला. आता सर्वांना पाठवूनही दिला, तरी पण तुम्हाला कसा काय दिसला नाही. त्यामुळे दादा तुम्ही आता मला ट्विटरवर फॉलो करा, असा टोला फडणवीस यांनी अजितदादांना लगावला.
त्यावर अजितदादा म्हणाले, मविआचे सरकार होते, त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. आता तुमची सत्ता आहे. तुम्ही सरकारमध्ये आहात. तुम्हाला ठाणे जिल्ह्यातील कामे करताना किती अडचणी येतात, याबाबत स्वतःला प्रश्न विचारा. तीच गोष्ट पालघर जिल्ह्याबाबत घडते. एकनाथ शिंदे गटातील कुणीही आलं की ते काम लवकर होतं. चंद्रकांतदादा किंवा मुनगंटीवार कुणीही विरोध करा, पण ही वास्तवता आहे. आम्ही सत्तेत होतो, आमचं सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा कधी अहंकाराला थारा दिला नाही, असंही अजितदादा यावेळी म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.