अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा : अजित पवार
नागपूर : खरा पंचनामा
सुप्रीम कोर्टाचा व राज्य सरकारच्या निर्णयाच्या सर्व बाबी समोर असताना एका व्यक्तीला त्यामध्ये फायदा मिळवून देत पदाचा दुरुपयोग केला आहे. ही बाब गंभीर असून या प्रकरणाची जबाबदारी स्विकारुन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्यांनी राजीनामा दिला नाहीतर मुख्यमंत्र्यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी अजित पवार यांनी आज सभागृहात केली.
आताच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविषयी ताशेरे ओढले आहेत. त्यांनी पदाचा दुरुपयोग केला असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
वाशिम जिल्ह्यातील मौजे घोडबाभूळ येथील सरकारी गायरान जमीनमधील 37 एकर 19 गुंठे जमिनीचा हा घोटाळा आहे. हा घोटाळा दीडशे कोटीचा आहे.
गायरान जमिनी कुणाला देता येत नाहीत. सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. त्याचे पालन आपण करत आलो आहोत. असे असताना योगेश खंडारे यांनी जिल्हा न्यायालयात मागणी केली होती. त्यांची ती मागणी फेटाळून लावली.
जिल्हा न्यायालयाने योगेश खंडारे यांचा जमिनीवर कोणताही अधिकार नसताना तो ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होता. सरकारी गायरान जमीन हडपण्याचा त्याचा इरादा होता असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवल्याचे अजित पवार यांनी सभागृहाला सांगितले.
सत्तार यांची हकालपट्टी करा
राजीनामा द्या, राजीनामा द्या, अब्दुल सत्तार राजीनामा द्या, अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी झाली पाहिजे.
गायरान बेचनेवालों को जूते मारो सालों को, 50 खोके एकदम ओके, सत्ताराने घेतले खोके, सरकार म्हणतेय एकदम ओके, वसुली सरकार हाय हाय, श्रीखंड घ्या कुणी, कुणी भूखंड घ्या. अशा घोषणा यावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी दिल्या.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.