Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आयुष संस्थेचे महाराष्ट्रभर जाळे पसरणार : पाटील

पुणे :
शैक्षणिक व वैद्यकीय सेवेबरोबरच समाजसेवी कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या कुपवाडमधील आयुष सेवाभावी संस्थेचे लवकरच महाराष्ट्रभर जाळे पसरणार, असा विश्वास पुणे (मावळ) येथील कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष अमोल पाटील यांनी व्यक्त केला. सांगली, कोल्हारपुर, सातारा, कार्य सुरु असून संस्थेने आता पुणे जिल्ह्यातही दमदार एंट्री केली आहे. मावळ तालुका (जि. पुणे) येथील पाठरगाव, ताजे, पिंपलोळी गट ग्रामपंचायत हद्दित आयुष सेवाभावी संस्था व विस्टिऑन यांच्या सीएसआर फंडातुन वॉटर प्युरि
फायर प्लांटचे उद्घाटन तसेच येथील जिल्हापरिषद शाळेतील शेकडो गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

अमोल पाटील, सिद्धार्थ बांगर, भानुप्रताप देशमुख यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी दत्तात्रय शेवाळे यांनी उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी मानुप्रताप देशमुख यांनी कंपनीविषयी तर अजित कांबळे यांनी आयुष संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली. यावेळी उपसरपंच सचिन केदारी, महावीर पाटील, सुरज शेख उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.