एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही : कर्नाटक विधानसभेत ठराव मंजूर
बेळगाव : खरा पंचनामा
महाराष्ट्र-सीमावाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही कर्नाटकने पुन्हा महाराष्ट्राला डिवचले आहे. सीमा भागातील एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, असा ठरावच कर्नाटक सरकारने दोन्ही सभागृहात मंगळवारी मंजूर केला.
यावेळी कायदा व सुव्यवस्था राखली जावी म्हणूनच केंद्रीय गृहमंत्र्यांनी मध्यस्ती केल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगून पुन्हा आगीत तेल ओतले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावांना कर्नाटकात सामील होण्याची इच्छा आहे, असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला होता. तेव्हापासून या वादाला तोंड फुटले. गेल्या ६० वर्षांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद संपलेला नाही. त्यातच, महाराष्ट्रातील गावावर कर्नाटकने दावा केल्याने या वादात ठिणगी पडली.
या ठरावाला कर्नाटक सरकारमधील विरोधी पक्षानेही या ठरावाला पाठिंबा दिला आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रादरम्यान असलेला सीमाप्रश्न महाजन आयोगानेच्या अहवालाने सुटला आहे. त्यामुळे संपलेल्या प्रश्नावरून शेजारील राज्यांनी उगाच वाद उगारून काढू नये, असं कर्नाटक विधिमंडळातील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी म्हटलंय.
सीमा भाग हा कर्नाटकचाच भाग आहे. याबाबत मी गंभीर असून केंद्रीय गृहमंत्रीच काय, पण पंतप्रधानांपुढे किंवा सर्वोच्च न्यायालयापुढे गेलो तरी आमच्या भूमिकेत कोणताच फरक पडणार नाही, अशी भूमिका कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.