राज्यातील दारू दुकाने, बार पहाटे पाचपर्यंत राहणार सुरू
मुंबई : खरा पंचनामा
नवीन वर्ष आणि ख्रिसमसच्या निमित्ताने दारू पिणाऱ्यांच्या संख्येत चांगलीच वाढ होते. अशा तळीरामांसाठी आता राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दि. 24, 25 आणि 31 डिसेंबर रोजी राज्यातील दारू दुकाने, बिअर बार पहाटे पाचपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
यंदा नववर्ष आणि ख्रिस्तमसच्या पार्श्वभूमीवर राज्यातली दारूची दुकाने पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यप्रेमींसाठी ही मोठी घोषणा केली आहे.
या घोषणेनुसार २४ डिसेंबर, २५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबर हे तीन दिवस दारुची दुकाने पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू असतील. एरवी रात्री ११ वाजेपर्यंत दारुची दुकानं खुली ठेवण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे तळीरामांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.