राज्यातील चार मंत्री येणार अडचणीत?
मुंबई : खरा पंचनामा
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री वादाच्या भोवऱ्यात सातत्याने सापडत आहेत. यातच आता शिंदे सरकारमधील 4 मंत्र्यांवर शिवसेनेकडून गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. त्यामुळे नागपुरात सुरू असलेल्या अधिवेशनात चारही मंत्री अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि मंत्री संजय राठोड यांच्यावर गायरान जमीन संदर्भात आरोप करण्यात आले आहेत. तर उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर औद्योगिक घोट्याळाचा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर शेतजमीनीवर अवैध बांधकाम केल्याचा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
साताऱ्यातील नावली येथील शेतजमीनीवर अवैध बांधकाम केल्याचा आरोप शंभुराज देसाईवर करण्यात आला आहे. शपथ पत्रात शेतजमीन म्हणून उल्लेख आहे परंतु जमीनीवर प्रत्यक्ष बांधकाम करण्यात आलं आहे. तर देसाई यांच्या सातबाऱ्यांवर बांधकामाचा उल्लेख कुठेच केला नाही. असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
2019 मध्ये मंत्री असतांना संजय राठोड यांनी 5 एकर गायरान जमीन खासगी व्यक्तीला देण्याचे आदेश दिले होते. गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्याची कोणतेही तरतुद नाही. तसे आदेश उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. तरी राठोड यांनी त्या जमीन संबंधित व्यक्तीला दिले होते, असा आरोप राठोड यांच्यावर करण्यात आला आहे.
ठाकरे गटाकडून शिंदे गटातील चार मंत्र्यांवर गँभीर आरोप करण्यात आल्याने भविष्यात राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.