Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलिस भरतीसाठी २ जानेवारीपासून मैदानी शक्य!

पोलिस भरतीसाठी २ जानेवारीपासून मैदानी शक्य! 



मुंबई : खरा पंचनामा

राज्यातील चालक व पोलिस शिपाई पदाच्या १८ हजार ३३१ जागांसाठी तब्बल १८ लाख २ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. उमेदवारांना परीक्षेचे वेळापत्रक २२ डिसेंबरनंतर त्यांच्या मोबाईलवर पाठविले जाणार असून २ जानेवारीपासून मैदानी चाचणी सुरु होण्याची शक्यता आहे. 

मैदानी चाचणीच्या दृष्टीने प्रत्येक शहर-जिल्ह्यात मैदानांची तयारी केली जात आहे. पहिल्यांदा चालक पदांची मैदानी चाचणी होईल आणि त्यानंतर पोलिस शिपाई पदांसाठी उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात येईल. रोज किमान एक हजार उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. 

१९ डिसेंबर रोजी सर्व जिल्ह्यांना त्यांच्या जिल्ह्यातील जागांसाठी नेमके किती व कोणत्या संवर्गातील किती अर्ज प्राप्त झाले आहेत, याची माहिती पोलिस महासंचालक कार्यालयाकडून पाठवली जाणार आहे. २२ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यांनी ठरवलेले नियोजन पोलिस महासंचालकांना कळवायचे आहे. मंगळवारी (ता. २०) त्यासंबंधी पोलिस महासंचालक बैठक घेतील. त्यानंतर संबंधित उमेदवारांना त्यांच्या ई-मेलवर परीक्षेचे वेळापत्रक व प्रवेशपत्र पाठविले जाणार आहे. 

पोलिस भरतीसाठी काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज केले आहेत. पण, त्या उमेदवारांना केवळ एकाच ठिकाणी मैदानी व लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. मैदानी चाचणी झाल्यावर काही दिवसांनी लेखी चाचणी होणार आहे. मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात एकाच दिवशी लेखी परीक्षा घेतली जणार आहे. 

परंतु, उमेदवाराने ज्या शहरात-जिल्ह्यात मैदानी चाचणी दिली, त्याचठिकाणी त्याला लेखी परीक्षा देखील द्यावी लागणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.