विठ्ठलाच्या दर्शनाला जाणारे दाम्पत्य अपघातात ठार
पंढरपूर : खरा पंचनामा
उपरी (ता. पंढरपूर) येथे विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी निघालेल्या सातारा तालुक्यातील पती-पत्नीचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. कार आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूरकडे जाताना पती-पत्नीवर काळाने घाला. या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील प्रकाश भुजबळ व लक्ष्मी भुजबळ (रा. शेनवडी, ता. खटाव, जि. सातारा) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचे दोन तुकडे झाले. तर कार उलटली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी उपचासाठी भुजबळ दाम्पत्याला रूग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.