Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

फ्लॅटसाठी बोगस कागदपत्रांद्वारे २५ लाखांची फसवणूक

फ्लॅटसाठी बोगस कागदपत्रांद्वारे २५ लाखांची फसवणूक 



सांगली : खरा पंचनामा 

सांगलीतील विजयनगर परिसरातील एका अपार्टमेंटमधील फ्लॅटच्या मूळ मालकाची बोगस कागदपत्रे करून दुसऱ्याला विकली. त्या फ्लॅटवर बँकेचा बोजा चढवत असताना फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी विजय पाखरे यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. 

प्रकाश चव्हाण, अमरसिंग राजपूत आणि मुत्थुट फायनान्सचे संबंधित कर्मचारी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. विजय पाखरे यांनी विजयनगर परिसरातील गोविंद टॉवर या अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट २४ लाख ५१ हजार रुपये किमतीला विकत घेतला होता. ०६ नोव्हेंबर २०११ रोजी पाखरे यांच्या ओळखीचे अमरसिंग राजपूत यांनी संशयितांशी संगनमत करून पाखरे यांच्या फ्लॅटच्या कागदपत्रांच्या नकला प्राप्त केल्या. 

त्या कागदपत्रांचा दुरुपयोग करून तो फ्लॅट परस्पर विक्री केला. तो फ्लॅट खरेदी करण्यासाठी राजपूत यांनी मुत्थुट फायनान्स इंडिया लिमिटेड या कंपनीचे कर्ज घेऊन ३३ लाख रुपयांचा आर्थिक बोजा फ्लॅटवर चढविला. फायनान्स कंपनीने संशयितांना फ्लॅटवर कर्ज देताना कागदपत्रांची तपासणी अथवा शहनिशा न करता सदर फ्लॅटचे कर्ज प्रकरण मंजूर करत फसवणूक केली. 

हा प्रकार उघडकीस येताच पाखरे यांनी आता विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.