दबंग पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांची कोल्हापूरला बदली
सांगली : खरा पंचनामा
सांगलीतील दबंग पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांची कोल्हापूर येथे बदली करण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्रातील 6 पोलिस निरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये निरीक्षक तनपुरे यांचा समावेश आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, शशिकांत पाटोळे, जयसिंह रिसवडकर यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. तर संजय मोरे, श्रीप्रसाद यादव यांची कोल्हापूर येथून सांगलीत बदली करण्यात आली आहे.
सांगलीत सध्या मुख्यालयाचे उपअधीक्षक म्हणून प्रभारी असलेले निरीक्षक अनिल तनपुरे यांची कोल्हापूर येथे बदली करण्यात आली आहे.
निरीक्षक तनपुरे यांनी सांगली जिल्ह्यात 5 वर्षे काम केले आहे. राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या तासगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी म्हणून उत्कृष्ट सेवा बजावली. अधिकाऱ्यांचे फेव्हरेट असलेल्या विश्रामबाग पोलिस ठाण्यात त्यांनी सलग तीन वर्षे सेवा बजावली. तासगाव, सांगलीत काम करताना त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. अशा दबंग पोलिस अधिकाऱ्याची बदली झाल्याने सांगलीकर हळहळत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.