सांगलीत वाहतूक पोलिसाला मारहाण; रिक्षा चालकाला अटक
सांगली : खरा पंचनामा
शहरातील विश्रामबाग चौकात मद्यधुंद रिक्षाचालकावर कारवाईसाठी गेलेल्या वाहतूक पोलिसास मारहाण करण्यात आली. बुधवारी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी रिक्षा चालकास पोलिसांनी अटक केली आहे.
प्रशांत पाटील (रा. माळी गल्ली, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संबंधित वाहतूक पोलिसाने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी विश्रामबाग चौकात कर्तव्य बजावत होते. त्यावेळी दुपारच्यावेळी संशयित पाटील हा रिक्षा (एमएच १० के ४३६४) मधून कुपवाडच्या दिशेने जात होता. मद्यप्राशन केल्यामुळे तो वेडीवाकडी, जोरात रिक्षा चालवत होता. काही वाहनचालकांनी त्याला थांबवले. त्यावेळी फिर्यादी कायदेशीर कारवाई करत असताना पाटील त्याठिकाणी आला. त्याने वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करून मारहाण केली. तुम्हाला दाखवतो, अशी धमकीही दिली. त्यात पोलिसाचा शर्ट फाटला.
नागरीकांच्या मदतीने पाटील यास मद्यधुंद अवस्थेत पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तेथे त्याच्यावर सरकारीत कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.