मिरजेत पोलिस अधिकाऱ्याच्या घरात चोरीचा प्रयत्न
मिरज : खरा पंचनामा
येथील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याच्या परसिरात वास्तव्यास असलेले पोलिस उपनिरीक्षक अकिब काझी यांच्या बंद बंगल्यात चोरीचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये काहीही चोरीला गेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस ठाण्याच्या जवळपास ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
पोलिस उपनिरीक्षक काझी हे काही दिवसांपूर्वी यात्रेसाठी गेले आहेत. तर त्यांचा मुलगा, सून असे दोघे तीन दिवसांपूर्वी जयसिंगपूर येथील मित्राकडे गेले होते. बंद घरावर पाळत ठेवून असलेल्या चोरट्याने शनिवारी मध्यरात्री बंगल्याचा पाठीमागील दरवाजा फोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर बंगल्यातील कपाट फोडून चोरीचा प्रयत्न केला. त्यानंतर चोरट्याने घरातील कपाट फोडून तसेच बंगल्यातील हॉलमध्ये असणारी सर्व कपाटे विस्कटून दागिने अथवा रोख रक्कम शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु काहीही चोरीस गेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरीचा प्रयत्न फसल्यानंतर चोरट्याने बंगल्यातून पलायन केले.
दरम्यान, काझी यांच्या शेजारी राहणाऱ्या नागरीकांना बंगल्याच्या मागील दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले.
याबाबत काझी यांच्या मुलाला माहिती देण्यात आली. काझी यांचा मुलगा घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान हा चोरीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यानुसार तपास सुरू असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.